Posts

Showing posts from June, 2018

खोडद गावा विषयी

खोडद  हे  महाराष्ट्राच्या   पुणे जिल्ह्यातले  जुन्नर तालुक्यातील ४५०० ते ५००० लोकवस्तीचे गाव पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावच्या पूर्वेला जुन्नर रस्त्यावर वसले आहे. गावाच्या पूर्वेला एक पिरॅमिडच्या आकाराचा सुळका असणारा डोंगर आहे. पश्चिमेला विशेष भौगोलिक असे काही नाही. फक्त ५ कि.मी. अंतरावर एक  मांजरवाडी  नावाचे गाव आहे. उत्तरेला  नारायणगड  आहे. त्याच्या कुशीत गडाची वाडी वसलेली आहे. खोडद  या गावी जगात दुसऱ्या क्रमांकाने शक्तिशाली समजली जाणारी एक  जायंट_मीटरवेव्ह_रेडिओ_टेलिस्कोप  महाकाय रेडिओ दुर्बीण आहे. ही दुर्बीण खगोलशास्त्राच्या निरीक्षणासाठी वापरली जाते. डोळ्यांनी निरीक्षण करायच्या ऑप्टिकल दुर्बिणीने केलेल्या निरीक्षणांना मर्यादा असल्याने हल्ली खगोलशास्त्राच्या अभ्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर होतो. प्रत्येक ग्रह, तारा स्वतःमधून विविध तरंगलांबीच्या चुंबकीय लहरी सर्वत्र सोडतो. या लहरींच्या अभ्यासावरून त्या ग्रहाचे वा ताऱ्याचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करता येते. या लहरी पकडण्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर होतो. अशा दुर्बि...